Breaking News

...त्या शौचालयांची चौकशी होणार या भितीने रातोरात शौचखड्डा पूर्ण !

...त्या शौचालयांची चौकशी होणार या भितीने रातोरात शौचखड्डा पूर्ण !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
    कोपरगाव तालुक्यातील  नाटेगाव येथील शौचालय घोटाळ्याची चौकशी करावी अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या पासून जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी व पंचायत समिती पर्यंत गेली असून गटविकास अधिकारी यांनी ४ तारखे पासून प्रत्यक्ष चौकशी करणार असल्याचे दैनिक लोकमंथनला प्रतिक्रिया देताना जाहीर केले आहे.
   अशातच गावात असलेल्या बेवारस शौचालयाची तक्रार व बातमी दैनिक लोकमंथन मध्ये  प्रसिद्ध झाली मात्र त्याची कुणकुण स्थानिक ग्रामपंचायत  पदाधिकारी यांना लागल्या मुळे त्यांनी गेल्या तीन चार दिवसात गावातील ज्या शौचालयाचे अनुदान पदरात पडले मात्र प्रत्यक्ष काम अपूर्ण होते त्या शौचालयाचे शोष खड्डे, दरवाजे, व भांडे बसवण्याचे काम गतीने सुरू करण्यात आले .
    गावात ज्या बेवारस शौचालयाची बातमी प्रसिद्ध झाली ते शौचालय विद्यमान सरपंच यांच्या नातेवाईकाचे  असल्याने व त्यांनी नुकतेच सदर बेवारस  शौचालयाचे शोष खड्डा व भांडे बसविल्याचे काम चौकशीच्या धाकाने तातडीने केले असल्याचे आमच्या प्रतिनिधीला खात्रीपूर्वक  समजले  सदर बेवारस शौचालय परिसरात कोणतेच घर, वस्ती किंवा मानवी राहिवसाचे अस्तित्व नसताना हे शौचालय नेमके कशासाठी उभारले आणि उभारले असेल तरी ते फक्त अनुदान लाटण्यासाठी उभारण्यात आले येवढे मात्र निश्चित तसेच या पूर्वी सुमारे तीस चाळीस वर्षांपूर्वी नोंद असलेले घर दाखवून सदर शौचालयाची उभारणी केली असल्यास सदर शौचालय बांधकाम करताना जी घर मिळकत दाखवली तिची ग्रामपंचायत घरपट्टी भरलेली आहे की नाही यावरून परीक्षेच्या शेवटच्या दिवशी कितीही प्रयत्न केले तरी वर्षभर केलेल्या चुकांचा परिणाम निकालातून दिसून येतो तसेच या चौकशी नंतर दिसून येईल.
    दरम्यान जे ग्रामस्थ गावातील ग्रामपंचायती कडे अधिकृत नोंद असलेले घरे सोडून अनेक वर्षे झाली तरी त्यांचे शौचालय नेमके कोणासाठी बांधले याचे उत्तर मिळणे कठीण आहे.