Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज दुपार पर्यंत २१ कोरोना बाधित !

कोपरगाव तालुक्यात आज दुपार पर्यंत २१ कोरोना बाधित !
करंजी प्रतिनिधी- 
     आज दि. ४ ऑगस्ट रोजी कोपरगाव  येथील केअर सेंटर मध्ये एकूण १०२ टेस्ट केल्या असता त्यात २० रुग्ण आढळून आले आहे
 तर त्यात ८२ निगेटीव्ह आले आहे, तर नगर येथे पाठवलेले २६ अहवालापैकी १ पॉजिटीव्ह तर २५ निगेटीव्ह आढळून आल्याने आज २ वाजेपर्यंत कोपरगाव मध्ये २१ रुग्णाची भर पडली असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
  यात शिंगणापूर गावात -९, संजीवनी कारखाना परिसर-२, टाकळी येथील देवकर वस्ती-३, पोहेगाव-४, कोपरगाव शहर साई कॉर्नर-१,कोपरगाव शहर सर्वज्ञ कॉलनी-१, कोपरगाव शहर स्वामी समर्थ नगर-१ या भागातील एकूण २१ रुग्ण सापडले आहे.
   सध्या कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह  रुग्णाची संख्या १२८ झाली असून एकूण रुग्ण संख्या १८३ झाली आहे।