Breaking News

गोरगरीब जनतेच्या हक्काचा घास कोण हिसकावतोय !

गोरगरीब जनतेच्या हक्काचा घास कोण हिसकावतोय !      
 येळपणे प्रतिनिधी :
     श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरे परीसरात काल सायंकाळी काही तरुनानी स्वस्त धान्य दुकानातील धान्य अवैध मार्गाने विक्रीस चालवलेल्या धान्याचा टेम्पो पकडला उपस्थित तरुणांनी चौकशी केली असता टेम्पो चालकांनी सांगितले हे तांदुळ गहु येळपणे येथील रावसाहेब पवार हे चालक असलेल्या स्वस्त धान्य दुकानातील हे धान्य आहे. हे सागताच एम.एच 12 एच डी. 2727 हा टेम्पो चालक महावीर गांधी सह हा टेम्पो तरुणांनी व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल वीर व ग्रामपंचायत उपसरपंच गणेश पवार यांनी हा टेम्पो बेलवंडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देत रीतसर कार्यवाही करावा असा अर्ज दिला आहे. आज 12 वाजण्याच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्याचे प्रभारी पुरवठा अधिकारी दत्तात्रय साळुंके व मंडल अधिकारी चिभळा आर. डी. टेमक  येळपणे तलाठी एस. बी. भाबरे यासह अधिकाऱ्यांनी येळपणे येथील सदर स्वत धान्य दुकानात येवुन वस्तुस्थितीची पाहणी केली व पंचनामा करुन स्वस्त धान्य दुकान तात्काळ सिल केले.   पुढील कार्यवाही काय होतेय या कडे ग्रामस्थाचे लक्ष लागुन आहे. संबंधित स्वस्त धान्य दुकानाबाबत ग्रामस्थांच्या अनेकदा तक्रारी होत्या. स्वस्त धान्य दुकानदार चालकाने संबंधित धान्य आपल्या दुकानातील नाही असा पवित्रा घेतला आहे. चौकट श्रीगोंदा तालुक्यात स्वस्त धान्य विक्री चे मोठे जाळे असण्याची शक्यता जाणकारांकडून मत.