Breaking News

कोपरगाव तालुक्यातील बाधीतांची ञिशतकाकडे वाटचाल !

कोपरगाव तालुक्यातील बाधीतांची  ञिशतकाकडे वाटचाल
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     गुरुवारी दुपार पर्यंत कोपरगाव येथे करण्यात आलेल्या २५८ रॅपिड अ‍ॅण्टिजेन टेस्ट मध्ये विक्रमी ६१ जणांचे अहवाल बाधित तर १९७ निरंक आले आहेत. तर खाजगी लॅब मध्ये २ बाधित तर सकाळी नगर येथून प्राप्त झालेल्या अहवालात २ बाधित , असे आज एकूण ६५ जणांचे अहवाल बाधित आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. आज अखेर कोपरगाव तालुक्यातील बधितांचा आकडा द्विशतक पार करून २७७ वर पोहचल्याने आता बाधीत आकड्याची वाटचाल ञिशतकाकडे होत असल्याने  तालुक्यात खळबळ उडाली आहे.
    आज आढळलेल्या ६५ पॉझिटिव्ह रुग्णात : संजीवनी येथील १७, सांगवी भुसार २ , येवला रोड १, चांदेकसरे १, पोहेगाव २, शिरसगाव 1, शिंगणापूर 3, समतानगर 3, गांधीनगर 1, धारणगाव रोड १, ब्राह्मणगाव ३, येसगाव आठचारी २, कोळगाव थडी १, शिंगणापूर नथुबाबा वस्ती १, निमगाव १, रवंदा १ टाकळी २, मंजूर २ निवारा ३, सोनारी १ साई लक्ष्मीनगर १ डाऊच बुद्रुक २ टाकळी फाटा १ आंचलगाव १, टिळेकर वस्ती १, देर्डे कोहृळे १, देर्डे चांदवड १, आपेगाव १ कोकमठान १ कारवाडी १ देवगाव १, शिंगीनगर १ , तर खाजगी लॅब मधील रिपोर्ट — ब्राम्हणगाव २ व आज सकाळचे बाधित २ असे एकूण ६५ जणांना आज कोरोनाची बाधा झाली आहे.