Breaking News

श्री गणेशाचे चारच दिवसात आगमन होणार मात्र कारखानदार चिंतेत !

श्री गणेशाचे चारच दिवसात आगमन होणार मात्र कारखानदार चिंतेत
निघोज प्रतिनिधी / संदिप गाडे :
     या वर्षी कोरोना रोगाचा प्रार्दू भाव असल्यामुळे जनतेस महामारीला सामोरे जावे लागत आहे . या वर्षी शनिवार दि२२ रोजी श्री गणेशाचे आगमन होणार आहे . गणपती उत्सव आवघ्या चार दिवसावर येऊन ठेपला असताना चालु वर्षी घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींच्या मागण्या थोडयाच प्रमाणात झाल्याने गणपती मुर्ती बनविणारे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत .आणि सर्वत्र मोठ- मोठे मंडळे या वर्षी गणपतीची मुर्तिस्थापना करतात की नाही असा प्रश्न मूर्ती कारखानदारास पडला आहे.

     गेल्या सहा महिन्यापासुन गणपती मुर्ति बनविण्याचे काम चालु असते . मात्र चालु वर्षी दरवर्षीच्या मागणी इतके गणपती बनवून झाले आहेत मात्र या गणपतींचे रंगकाम करायचे कि नाही या द्विधा मनस्थितीत हे मुर्तिकार आहेत. 
कोरोना रोगाच्या महामारीमूळे दरवर्षीप्रमाणे गणपती तयार झाले आहेत मात्र या वर्षी मागणी मात्र कमीच आहे .
-----------
     (दादाभाऊ रासकर -गणपती कारखानदार पिंपळनेर )