Breaking News

अखेर मुळा धरणाकडे पाण्याची जोरदार आवक सुरू दोन दिवसात धरण निम्मे भरणार !

अखेर मुळा धरणाकडे पाण्याची जोरदार आवक सुरू दोन दिवसात धरण निम्मे भरणार !
राहुरी शहर प्रतिनिधी :
        मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर आज बुधवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे धरणाकडे आज सायंकाळी कोतूळ कडील लहित खुर्द येथील मुळा नदी दुथडी भरून व्हायला सुरुवात झाली. आज बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी लहित खुर्द येथे मुळानदी तीन मीटरला ७ हजार क्यूसेक ने वहात होती, परिणामी  धरणाकडे पाण्याची जोरदार आवक सुरू झाली आहे . पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू झाल्याने मुळा धरण येत्या दोन दिवसात पन्नास टक्के अर्थात निम्मे भरण्याची शक्यता आहे . 
 मागील वर्षी एक ऑगस्ट रोजी धरण निम्मे भरले होते . आज सकाळी धरणाचा पाणीसाठा १२ हजार  ३०० दशलक्ष घनफूट इतका होता , तर धरणा कडे १ हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू होती . यंदा देखील मुळा धरण भरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे .जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता अण्णासाहेब आंधळे शाखा अभियंता सायली पाटील व अन्य अधिकारी , कर्मचारी पाणी पातळी इकडे लक्ष देऊन आहेत.