Breaking News

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पोहेगाव आजपासून पाच दिवस बंद - सरपंच औताडे

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी  पोहेगाव आजपासून पाच दिवस बंद - सरपंच औताडे
 (आणखी चार कोरोना पॉझिटिव्ह संख्या  सतरावर )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
       ५ आॕगस्ट रोजी आढळलेल्या पोहेगाव येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील  लोकांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते त्यापैकी चार जनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून रूग्नांची संख्या १७ वर पोहोचली आहे. ही अतिशय चिंताजनक बाब असून गावातील प्रत्येक नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे आहे. करोणाचा चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत आजपासून पाच दिवस शनिवार ते बुधवार पर्यंत संपूर्ण गावातील व्यवहार बंद राहतील. नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन सरपंच अमोल औताडे यांनी केले आहे.
      पोहेगांव येथील कोरोना दक्षता टिमही सक्रिय झाली असून विनाकारण फिरणा-यांवर कारवाई तसेच माक्स न वापरणाऱ्या व्यक्तींना दंडाची कारवाई करण्याचा पवित्रा ग्रामपंचायतीच्या वतीने  घेतला आहे.
 संजीवनी येथील व भजनी मंडळातील सापडलेल्या रुग्णाच्या संपर्कातील ५० संशयित रुग्णाचे स्त्राव कोविड १९ सेंटरला तपासणीसाठी पाठवले होते. सकाळी अकरापैकी चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पोहेगावात एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर नितीन बडदे यांनी कल्पना दिल्यानंतर लगेचच शिवसेना नेते नितीनराव औताडे, सरपंच अमोल औताडेे, उपसरपंच प्रशांत रोहमारे ,ग्रामविकास अधिकारी रामदास काळे व पोहेगाव कोरोना दक्षता टीम व आरोग्य यंत्रणेची बैठक झाली. या बैठकीत शिवसेना नेते नितीनराव औताडे यांनी कोरोणा विषाणूला रोखण्यासाठी व त्याची साखळी तोडण्यासाठी सरपंच अमोल औताडे व ग्राम‌विकास रामदास काळे यांना गावची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करत गांव बंद ठेवण्याची सुचना केली. त्यांच्या सूचना गांभीर्याने घेत आज शनिवार दिनांक 8 ऑगस्ट ते बुधवार दिनांक  १२ ऑगस्ट पर्यंत पोहेगाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
जीवनावश्यक क वस्तू सह सर्व व्यवहार दवाखाना व मेडिकल देखील बंद राहणार आहे.