Breaking News

पारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल !

पारनेर मनसे तालुका उपाध्यक्ष महेंद्र गाडगे याने प्रशासनास वेठीस धरले म्हणून गुन्हा दाखल !
पारनेर प्रतिनिधी - 
     पारनेर तालुक्यातील  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या  तालुका उपाध्यक्ष महेंद्र सखाराम गाडगे वय 35 कळस तालुका पारनेर यांनी सोशल मीडियावर आत्मदहनाचा इशारा दिला त्यामध्ये पोस्ट व्हायरल केली की अविनाश दादा तुमच्या  साठी मी जीव सुद्धा द्यायला तयार आहे, तुमच्या वर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ मी आज पारनेर तहसील कार्यालयात दुपारी ठीक चार वाजता आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलाय , जय मनसे असे त्यात नमूद केले त्यामुळे तो तहसील कार्यालय येथे आल्यानंतर तहसीलदार ज्योती देवरे यांना म्हटला की मी हे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी केले होते त्यामुळे तहसीलदार ज्योती देवरे यांनी प्रशासनाला इतर कामात व्यस्त असताना अशा प्रकारचे प्रशासनात वेठीस धरले म्हणून महेंद्र गाडगे यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस प्रशासनाला दिले त्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
अविनाश जाधव मनसे जिल्हाध्यक्ष ठाणे यांना तडीपार केल्याबाबत व अटक होणार असल्याने महेंद्र गाडगे यांनी अशा प्रकारची पोस्ट पारनेर येथे सोशल मीडियावर वायरल केली असल्याची माहिती समोर येत आहे.