Breaking News

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथून दुचाकी चोरीला !

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथून दुचाकी चोरीला !


पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या येथून अज्ञाताने हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल चोरून नेली आहे याबाबत पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिपक रामचंद्र खोसे  वय २८ धंदा -नोकरी  रा पाडळी दर्या ता. पारनेर,अ. नगर यांनी फिर्याद दिली आहे
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र खोसे यांच्या घराच्या पडवी मध्ये ५५००० किं. ची हिरो कंपनीची एक्सट्रीम गाडी नंबर एम एच १६ सी एस ४२०८ मो. सा. लाल व काळ्या रंगाची गाडी लावली होती ती दि १६ रोजी रात्री अज्ञाताने संमतीशिवाय  लबाडी च्या इराद्याने स्वतःच्या फायद्याकरता चोरून नेली आहे  याबाबत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोहे उजागरे करत आहेत.