Breaking News

पारनेर तालुक्‍यात आज दिवसभरात २३ कोरोना बाधित !

पारनेर तालुक्‍यात आज दिवसभरात २३ कोरोना बाधित !
पारनेर प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे दि.१९ रोजी प्राप्त झालेले २३ कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
या पॉझिटिव्ह अहवालात वासुंदे १ कान्हूर पठार ३ टाकळीढोकेश्वर ४ राळेगण थेरपाळ १ हंगा ३ पठारवाडी १ जवळा ४गांजीभोयरे ४ निघोज १ यांचा समावेश आहे.
तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांचा वाढता आकडा चिंतेचा विषय होत आहे समूह संसर्ग वाढला असल्याने रुग्ण वाढत आहेत याकडे नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमाप्रमाणे पालन करण्याचे व कोरोना सदृश्य लक्षणे दिसताच आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी केले आहे.
कोरोना संशयित अहवालात पॉझिटिव्ह आले आहेत त्या गावातील कोरोना रुग्ण राहत असलेला १०० मीटर चा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.