Breaking News

चांदेकसारेत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन !

चांदेकसारेत श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
     कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे काल अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचे औचित्य साधत श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत कार्यालयात करण्यात आले.
     यावेळी माजी सरपंच केशवराव होन, सरपंच पुनम खरात, राहुल होऊन, धीरज बोरावके, संजय विघे, सूनील खरात, ग्राम विकास प्रल्हाद सुकेकर,मलुजी होन, अर्जुन बोरावके अदि उपस्थित होते.
      यावेळी बोलताना केशवराव होन यांनी सांगितले की अखंड भारताचे दैवत श्रीराम यांच्या मंदिराचे भूमिपूजन अयोध्या मध्ये होत आहे. एक वचनी एक पत्नी रघुकुल तीलक रामाने 14 वर्षे वनवातात अनेक राक्षसांचा संहार केला. अयोध्या येथे होत असलेल्या भूमिपूजनाला अनेकांना उपस्थित राहण्याचा योग येणार होता मात्र देशात कोरोनाव्हायरसचे संकट असल्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आवाहन करत आपल्या घरोघरी रामाची पूजा करावी असा संदेश दिला होता. त्यामुळे अयोध्याला जाणे झाले नाही. आता राम जन्मभूमी चे भूमिपूजन आयोध्देत झालेले आहे. लवकरच इतर राक्षसा प्रमाणे कोरोनाव्हायरसचाही संहार प्रभू राम करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गावात अनेकांनी गुढ्या तोरणे उभारून श्रीराम जन्मभूमीच्या भूमिपूजनाला शुभेच्छा दिल्या.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सुकेकर यांनी केले तर सरपंच पुनमताई खरात यांनी आभार मानले.