Breaking News

निघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह

निघोज येथील कुकडी नदीच्याकुंडा जवळ पाण्यात आढळला पुरुष जातीचा मृतदेह

---------
मृतदेह पेटीमध्ये सापडल्यामुळे घातपाताची शक्यता


पारनेर प्रतिनिधी -
पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुकडी नदीच्या कुंडामध्ये अंदाजे वय 35 ते 40 वर्ष पुरुष जातीचे प्रेत पाण्यामध्ये वाहून आले होते याबाबतची माहिती पारनेर पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन पाहणी केली
निघोज येथील कुकडी नदी च्या कुंडात एका पेटी मध्ये हा मृतदेह आढळून आला त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती कळल्यानंतर पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली तर हे प्रेत पुरुष जातीचे असल्याची माहिती समोर आली तसेच मयत पुरुषाचे 35 ते 40 वर्षे वय असण्याची शक्यता आहे कुकडी नदीचा पाण्याच्या प्रवाहामध्ये हे प्रेत वाहून आले असण्याची शक्यता आहे या व्यक्तीचा दोन दिवसापूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे याबाबत पोलिसांचा शोधाशोध सुरू आहे प्रथमता अकस्मात मृत्यूची नोंद केली जाणार आहे मृतदेहाचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच पोलीस तपासाची दिशा ठरवली जाणार आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.
मृतदेह लोखंडी पेटीमध्ये असल्यामुळे काहीतरी घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.