Breaking News

नेवासा तालुक्यात कोरोनाचा कहर, शनिवारी दिवसभरात १७ रुग्ण वाढले !

नेवासा तालुक्यात कोरोनाचा कहर, शनिवारी दिवसभरात १७ रुग्ण वाढले !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
        नेवासा तालुक्यात शनिवार (दि. ८) रोजी दिवसभरात १७ रुग्णांची वाढ झालेली असून त्यामध्ये एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश असल्याची माहीती आरोग्य विभागातील सुञांनी दिली. तर तालूक्यातील ६ रुग्णांनी कोरोना या संसर्गजन्य आजारावर मात करुन कोरोनामुक्त झाले असल्याची माहीती तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांनी दिली.
      नेवासा तालूक्यात शनिवार (दि ८) रोजी दिवसभरात १७ रुग्णांची वाढ झालेली असून नेवासा शहर १०,घोडेगांव ०२,शनिशिंगणापूर ०१, उस्थळ दुमाला १, नारायणवाडी १,सोनई १,तेलकुडगांव १ अशा कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झालेली आहे. तर ०६ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली असून ८ रुग्णांचा यापुर्वी मृत्यु झालेला आहे.
       नेवासा तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांना शनिवार (दि.८) रोजी आलेल्या अहवालातून दिलेली माहीती अशी की,तालूक्यात एकुण ३४१ रुग्णांपैकी २३३ रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे.  त्यामध्ये ०८ रुग्णांचा मृत्यु झालेला आहे तर १०० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ते लवकरच कोरोनामुक्त होणार आसल्याचा आशावादही डॉ सुर्यवंशी यांनी यावेळी बोलतांना व्यक्त केला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभाग सतर्क झालेला असून कोरोना या संसर्ग आजार टाळण्यासाठी घरीच रहा सुरक्षित राहण्याचा सल्लाही यावेळी त्यांनी दिला.