Breaking News

निघोज गाव तीन दिवस लॉकडाऊन,प्रशासनाचे आदेश !

निघोज गाव तीन दिवस लॉकडाऊन,प्रशासनाचे आदेश !
निघोज प्रतिनिधी -
  निघोज मधील  ग्रामस्थ, नागरीक, व्यवसायिकांनी प्रशासनाच्या आदेशानुसार निघोज गाव सोमवार दि. ३ ऑगस्ट ते बुधवार दिनांक ५ ऑगस्ट पर्यंत प्रशासनाच्या आदेशानुसार ३ दिवस लॉक डाऊन करणे गरजेचे असल्यामुळे वैद्यकीय सुविधा व पेट्रोल पंप सोडुन इतर सर्व दुकाणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
     निघोज गावातील सर्व नागरिकांनी प्रशासन व आरोग्य विभागाच्या अटी व शर्थीचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवावे. सर्वांनी सेनिटायझर तसेच मास्कचा वापर करावा. विनाकारण कोणीही गावामध्ये फिरु नये, अथवा चौकात, गावात एकत्रीत बसु नये.
     "सुरक्षित रहा, सतर्क रहा, प्रशासनाला सहकार्य करा."
"पुनश्य एकदा लक्षात घ्या आपल्या गावची सर्वांगिन  सुरक्षा आपल्याच हातात आहे." 
असे आव्हान ग्रामपंचायत निघोज व कोरोना दक्ष समितीने केले आहे .