Breaking News

भाजप आमदार मेघना बोर्डीकर यांना कोरोनाची लागण !

BJP MLA From Jintur Meghana Bordikar Found Corona Positive ...

 परभणी : जिंतूर-सेलू मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार मेघना बोर्डीकर (साकोरे) यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बोर्डीकर यांच्या पतीसह कुटूंबातील अन्य काही सदस्यही पाॅझिटिव्ह आढळले असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांत अनेक लोकप्रतिनिधी कोरोना पाॅझिटिव्ह आढळले आहेत. कोल्हापूर दक्षिणचे कॉंग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील कॉंग्रेसचे कोल्हापूरचे दुसरे आमदार चंद्रकांत जाधव, चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण तसेच शिवसेनेचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मेघना बोर्डीकर जिंतूर-सेलू च्या भाजप आमदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय भांबळे याचा पराभव करून विधानसभेत यंदा प्रवेश केला. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.