Breaking News

वारी येथे ब्रह्मकमळ फुलले !

वारी येथे ब्रह्मकमळ फुलले !
 कोपरगाव /  तालुका प्रतिनिधी :
        कोपरगाव तालुक्यातील वारी येथील  किशोर खैरणार यांच्या घरी वर्षातुन फक्त एकदाच फुलणारं ब्रम्ह कमळ आज फुलले त्यांच्या कुटुंबातील सर्वांनी आनंद व्यक्त करीत दर्शन घेउन  पुजन केले सध्या श्रावण महिना सुरु असुन हिंदु धर्मात आध्यात्मिक दृष्ट्या हा महीना अत्यंत पवित्र  आणि महत्त्वाचा असा मानला जातो ब्रम्हकमळ हे स्वर्गातील फुल असल्याची मान्यता असल्याने वारीतील महिलांनी  पुजन करुन दर्शन घेतले आणि श्रावणी सोमवार असल्याने वारीचे ग्रामदैवत श्री रामेश्वर भगवान मंदिरात मनोभावे ब्रम्हकमळ पिंडीवर अर्पण करून दर्शन घेतले यावेळी खैरणार परिवाराचे सर्व सदस्य तसेच भगवानराव पठाडे, अशोक कानडे, बनभेरु आदींनी सपत्नीक दर्शन घेतले