Breaking News

अकोले तालुक्यात आज आढळले १२ कोरोना पॉझिटिव्ह!

अकोले तालुक्यात आज आढळले  १२ कोरोना पॉझिटिव्ह!

अकोले /प्रतिनिधी :
  काल शुक्रवारी अकोल्यात १० करोना  बाधित आढळल्या नंतर आज तालुक्यात पुन्हा  १२ कोरोना  पॉझिटिव्ह रुग्ण आंढळले आहे  यात कोतुळ, ब्राम्हणवाडा , अकोले शहर, चास , हिवरगाव आंबरे ,देवठाण  येथील रुग्णां चा समावेश आहे.
आज खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील महालक्ष्मी रोडवरील अगस्तीनगर येथे राहणाऱ्या ४८ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथील६९ वर्षीय पुरुष, देवठाण येथील ५६ वर्षीय महीला, कोतुळ येथील ६७ वर्षीय पुरुष,अशी चार व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला.
तर कोतुळ ग्रामीण रूग्णालयात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये ब्राम्हणवाडा येथील ६८ वर्षीय पुरूष, ६२ वर्षीय महीला, ८० वर्षीय पुरूष,६८ वर्षीय महीला,चास येथील ३२ वर्षीय महीला अशी पाच व्यक्ती
 तर देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये हिवरगाव आंबरे येथील ५० वर्षीय पुरूष व ०९ वर्षीय लहान मुलगा अशा दोन व्यक्ती पॅाझिटीव्ह आल्यात 
तसेच संगमनेर येथील कोविड सेंटरच्या ॲन्टीजन टेस्टमध्ये तालुक्यातील  चितळवेढे येथील ३० वर्षीय तरुणाचा अहवाल पॅाझिटीव्ह आला.तालुक्यात आज खाजगी प्रयोगशाळेत ०४ व ॲन्टीजन टेस्ट मध्ये ०८अशी एकुण १२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

तालुक्यातील एकुण रुग्ण संख्या ३७३  झाली आहे.त्यापैकी २४५ व्यक्ती  नी करोना वर मत केली आहे  तर ०९ व्यक्तीचा मृत्यू झाला असून ११९ रुग्णांवर उपचार सुरु आहे
-  -----