Breaking News

गरीबांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा - सरपंच ठकाराम लंके !

गरीबांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा - सरपंच ठकाराम लंके
---------
निघोज ग्रामपंचायतचा मागासवर्गीयांना मायेचा आधार-


निघोज प्रतिनिधी :
     जनसेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वसामान्यांना अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला तर त्यात आत्मिक समाधान मिळते,त्याच बरोबरच आपण दुसऱ्यांच्या अडीअडचणी,दुःखही कमी शकतो असे प्रतिपादन सरपंच ठकाराम लंके यांनी केले.
शनिवार (दि.२९)रोजी निघोज(ता.पारनेर)येथे ग्रामपंचायत कार्यालयात गोरगरीब कुटूंबाना संसार उपयोगी किराणा साहीत्य खरेदी करण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायतीच्या विशेष निधितून १५ टक्के मागासवर्गीय या सदरातून १७० लाभार्थीनां (एकुन १ लाख ७o हजार रुपये)प्रत्येकी एक हजार रुपये प्रत्येक कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यावर वर्ग केले असल्यांची माहीती ही सरपंच ठकाराम लंके यांनी दिली.
    मार्च महीण्यांपासून कोरोणाच्या काळात गावपातळीवर अत्यंत बिकट स्थिती निर्माण झाली होती.अनेक वेळा प्रशासनाच्या आदेशामुळे गाव बंद ठेवण्यांत आले होते,अशा स्थितीत गावातील अनेकांचे रोजगार बंद झाले,हाताला काम,धंदा नसल्यांने अनेकावर उपासमारीची वेळ आल्यांने रोजी,रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता,त्यामुळे इतर विकास कामापेक्षा गरजू कुंटूबासाठी असे समाजउपोगी उपक्रम राबविणे ही खरी काळाची गरज असुन अशा कुंटूबांना थोडी फार मदत करून एक सामाजिक दृष्टीकोनाची आपुलकी म्हणून मायेचा आधार दिला असल्यांचे सरपंच ठकाराम लंके यावेळी म्हणांले.
 यावेळी लक्ष्मण महाराज शेटे,सतिष साळवे, सामाजिक कार्यकर्ते संतोष लाळगे,मोहन खराडे,संदिप वराळ,राजु सोनवणे,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय वाळके यांनी सर्वांचे आभार मानले.
           
"सामाजिक धायित्व या भावनेतून गावातील हातावर पोट भरणांऱ्याअनेक गोर,गरीब कुटूंबाची पोटाची भुक शमविण्यांसाठी,मायेचा आधार मिळावा या उदात्त हेतूने कोरोना महामारीच्या संकटात कर्तव्य म्हणून मदतीचा हात देण्यांचा लाखमोलाचा प्रयत्न ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंच ठकाराम लंके यांनी केला.या उपक्रमाची इतरांनी ही प्रेरणा घेवून गरजू लाभार्थीनां योग्य ती मदत करावी".
------------
(ह.भ.पा.लक्ष्मण महाराज शेटे)