Breaking News

बिल्वतिर्थाचे पाणी व त्रिस्थळी (बेलापूर,बन, व उक्कलगाव,)ची माती श्रीराम मंदिर भूमिपूजन प्रसंगी अयोध्येला रवाना !

बिल्वतिर्थाचे पाणी व त्रिस्थळी (बेलापूर,बन, व उक्कलगाव,)ची माती श्रीराम मंदिर भूमिपूजन प्रसंगी अयोध्येला रवाना !
बेलापूर प्रतिनिधी --
श्रीरामजन्मभुमी अयोध्या येथे दि 5 आॅगष्ट रोजी मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ अखंड भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व बेलापुरचे भूमीपुत्र प पू स्वामी श्री गोविंददेवगिरीजी महाराज व देवगडचे महंत पू श्री भास्करगिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत होत आहे भूमीपूजना साठी बिल्वतीर्थाचे पाणी व त्रिस्थळी बेलापूर बन व उक्कलगावची माती आज पुणे येथे बेलापूरातील कारसेवक श्री दिलीप काळे रामप्रसाद व्यास गजानन डावरे व नटवरलाल सोमाणी यांच्या हस्ते पूजन करुन पाठवण्यात आली त्याप्रसंगी पूजनीय श्री महेशजी व्यास जि प सदस्य शरद नवले उपसरपंच रविंद्र खटोड शहर भा ज प उपाध्यक्ष ओमप्रकाश व्यास रामनाथजी शिंदे शेखर डावरे मुन्ना खरात किराणा व्यापारी संघटनेचे प्रशांत लढ्ढा गोशाळा सचिव राजेंद्र शर्मा विशाल मेहेत्रे लक्ष्मण शिंदे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा विष्णुपंत डावरे  अतिश देसर्डा व चालकसोमनाथ राशिनकर आदि उपस्थित होते