Breaking News

आता नगर शहारा मध्ये जनता कर्फ्यू ची गरज - सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा

आता नगर शहारा मध्ये जनता कर्फ्यू ची गरज - सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा
अहमदनगर/प्रतिनिधी- 
     सध्याच्या परिस्थिती मध्ये कोरोना विषाणू ने अहमदनगर शहरात थैमान घातले असून अत्यंत भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे या स्थितीतून बाहेर पडावयाचे असल्यास जनता कर्फ्यू ची गरज आहे असे आवाहन  सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केले आहे. 
गेल्या दहा दिवसात नगर शहरात कोरोना पॉसिटीव्ह चे प्रमाण अत्यंत भयानक स्वरूपात वाढत असून या रुग्णावर उपचार करण्यासाठी तसेच त्यांना कोरोनटाईन करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये  व इतरत्र जागा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत असून उपचाराविना रुग्ण दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. या परिस्थिती ला फक्त प्रशासनाला जबाबदार धरून उपयोग नाही तर प्रशासनापेक्षा जनतेची जबाबदारी जास्त वाढली आहे.
      प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन नागरिक करीत नसल्याचे निदर्शनास येत आहे, अनेक जण अजूनही तोंडाला मास्क लावीत नाहीत अगर अद्याप ही भाजी मार्केट व इतर बाजार मध्ये सोशल डिस्टेनसिग चा पूर्ण फज्जा उडालेले दिसून येत आहे.  अशा स्थिती मध्ये जनतेने प्रशासनाला सहकार्य करणे, प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याची गरज व आवश्यकता आहे. 
       हिच परिस्थिती राहिल्यास पुढे कोरोना रुग्णाचे प्रमाण भयानक वाढतील व मग प्रशासनाला व जनतेला या मधून बाहेर निघणे अशक्य होईल यासाठी आताच  जनतेने स्वतःहुन पुढे येऊन स्वयंफुर्तीने जनता कर्फ्यू लागू करून घ्यावी या साठी प्रशासनाने  लोकडाऊन करण्याची वाट पाहू नये.  ज्यांना हा आजार जडला त्यांनाच याचे गांभीर्य लक्षात आलेले आहे परंतु इतरांना याचे गांभीर्य दिसून येत नाही.  यासाठी नगर शहरातील लोकप्रतिनिधीनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन जनता कर्फ्यू चे महत्व  जनतेला पटवून देऊन जनता कर्फ्यू जनतेने स्वतःहुन स्वीकारावे  असे  आवाहन जनतेला करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा यांनी एका पत्रकान्वये केले आहे.