Breaking News

रुग्णालयाची तोडफोड केल्याने रुग्णाच्या नातेवाईकां विरुद्ध गुन्हा दाखल !

रुग्णालयाची तोडफोड केल्याने  रुग्णाच्या नातेवाईकां विरुद्ध गुन्हा दाखल !


गंगापूर प्रतिनिधी :

गंगापूर येथील संजीवनी हॉस्पिटल येथे डॉक्टरांकडून आजारी  महिलेची  तपासणी करण्यात विलंब केल्याने महिलेचा मृत्यू झाला  म्हणून नातेवाईकांनी दवाखान्याची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केले  याविषयी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार
येथील गोपाल भड यांच्या आई आजारी असल्याकारणाने त्यांनी शुक्रवारी सकाळी साडे सात वाजे दरम्यान शहरातील संजीवनी हॉस्पिटल येथे उपचारासाठी नेले होते डॉक्टर डॉक्टर योगेश गवळी यांनी सदर महिलेची तपासणी करून  नातेवाईकांना सांगितले की  यांचा उपचार येथे शक्य नसून  सदर महिलेला तात्काळ औरंगाबाद येथील मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे व त्या ठिकाणी उपचार करावे  असे सांगितले  यावर भड यांनी आईला खाजगी वाहनातून  औरंगाबादला उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच  त्यांची प्राणज्योत मालवली संजीवनी हॉस्पिटल चे डॉ योगेश गवळी हॉस्पिटल च्या  वरच्या मजल्यावरच राहतात.
   
  डॉक्टर थोडे लवकर रुग्णाला बघण्यासाठी खाली आले असते  तर आपली आई वाचली असती असा ग्रह धरून  त्यांनी आहे त्या परिस्थितीत  गंगापूर गाठून गंगापूर येथील  संजीवनी हॉस्पिटल गाठले  व आपल्या नातेवाईका  मित्रमंडळींना जमवून संजीवनी रुग्णालयावर हल्लाबोल केला यात रुग्णालया बाहेर उभ्या असलेल्या डॉक्टर गवळी यांच्या  बीएमडब्ल्यू कारची तोडफोड करीत नुकसान केले तर रुग्णालयात घुसून धुडगूस घालीत रुग्णालयाच्या ओपीडी तील प्रतिक्षालयातील काचा तसेच सीसीटीव्ही स्क्रीन व थर्मल स्कॅनर, संगणक फोडून डॉक्टरांच्या केबिनमध्ये घुसून धक्काबुक्की करीत केबीनमध्ये तोडफोड केली. माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशन चे सहा.पो.नि. अर्जुन चौधर, पो.उ.नि. रामहरी चाटे यांनी सहकाऱ्यांसह धाव घेत नातेवाईकांना शांत करून परीस्थिती नियंत्रणात आणली.  पो.नि. मच्छिंद्र सुरवसे तसेच नगरसेवक भाग्येश गंगवाल, अविनाश पाटील, यांनी समजूत काढून गाडीतील मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. डॉ योगेश गवळी यांनी गंगापूर पोलीस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला केलेल्या रुग्णाचे नातेवाईक गोपाळ युवराज भड , अनिकेत संतोष भड , ओम पुरुषोत्तम भड, ऋषिकेश संतोष भड, सुरज प्रकाश यंदायत  सर्व रा. गंगापूर या पाच जणांवर भा.दं.वि.३०७,२३२,५०४,४५२,१४३,१४७,१४८,१४९,२६९ नुसार  गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे पुढील तपास पो उ.नि. मुंढे हे करीत आहेत.
शुक्रवारी सकाळी साडे सात वाजे दरम्यान वृद्ध आजारी महिलेस घेऊन काही लोक माझ्या संजीवनी हॉस्पिटल येथे आले होते  कोरोनासदर महिलेची तपासणी करून ईसीजी केल्यानंतर हा हृदय विकार असल्याचे वाटल्याने मी रूग्णास तात्काळ तज्ञ डॉक्टर कडे घेऊन जाण््याचा सल्ला दिल्याने रुग्णास नातेवाईक घेऊन गेले . त्यानंतर अचानक तासाभरात पुन्हा येऊन हॉस्पिटल मध्ये तोडफोड करून मारहाण केली.
----------------
डॉ योगेश गवळी
संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल