Breaking News

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील १४ अहवाल निगेटीव्ह !

कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथील १४ अहवाल निगेटीव्ह !
करंजी प्रतिनिधी-
     काल बुधवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी कोपरगाव आरोग्य प्रशासनाने १६ संशयितांचे स्राव तपासणीसाठी नगर येथे पाठवले असता त्यातील १४ अहवाल शिंगणापूर येथील होते ते सर्व १४ अहवाल निगेटीव्ह आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
 नगर येथे पाठवलेल्या १६ अहवाला पैकी शिंगणापूर येथील १४ निगेटीव्ह आले असले तरी चिंतेची बाब म्हणजे कोपरगाव शहरालगत असलेल्या गजबजलेल्या वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खडकी येथिल २ अहवाल पॉजिटीव्ह आले असून यात ३८ व २७ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आले असल्याने कोरोना कोपरगाव मध्ये थांबायचा नाव घेईना असेच चित्र समोर येतांना दिसत आहे.
  सध्या कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १२६ झाली आहे.