Breaking News

ताई तुझ्या रक्षणासाठी हा भाऊ सदैव तत्पर असेल रोहित पवारांनी 'दादा' बनून जपले बहीण-भावाचे नाते !

ताई तुझ्या रक्षणासाठी हा भाऊ सदैव तत्पर असेल रोहित पवारांनी 'दादा' बनून जपले बहीण-भावाचे नाते !
जामखेड प्रतिनिधी :
         रक्षाबंधनाच्या पवित्र बंधनाला एका वेगळ्याच उंचीवर नेत राष्ट्रवादीचे नेते तथा कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी 'दादा' बनून बहीण भावाचे अतुट नाते जपले आहे. 
        आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतुन मतदारसंघात पार पडलेल्या रक्षाबंधनाच्या उपक्रमात  जामखेड तालुक्यातील जामखेड ग्रामीण रुग्णालय,अरणगाव, खर्डा,नान्नज आदी गावातील आरोग्य उपकेंद्रावर रक्षाबंधन पार पडले.यात  आ रोहित पवारांच्या विचाराच्या नेते कार्यकर्त्यांनी कोरोना योद्धा असलेल्या महिला डॉक्टर,आरोग्यसेविका,आशा सेविका सर्व  कर्मचारी भगीनींच्या हातून राखी बांधून घेत 'ताई तुझ्या रक्षणासाठी हा भाऊ सदैव तत्पर असेल' अशी शपथ दिली.
     आपला जीव धोक्यात घालून राज्यभरातील महिला डॉक्टर,आरोग्यसेविका,आशासेविका सर्व महिला कर्मचारी भगिनी प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेत आहेत.  त्यांच्या अविरत सेवेचे आभार मानावे तितके कमीच आहेत.मात्र त्यांचे धैर्य,मनोबल वाढावे म्हणुन हा उपक्रम राबवण्यात आला.विशेष म्हणजे बहिणीच्या ओवाळणीची भेट म्हणुन प्रत्येक भावाकडून सनीटायझर देण्यात आले. कर्जत-जामखेडची कोरोना बाबतची परिस्थिती हाताळताना आ. रोहित पवारांनी सुरुवातीपासुनच विशेष काळजी घेतली आहे. रक्षाबंधन हे निमित्त असले तरी प्रत्येक कोरोना योद्धयाची काळजी घेणारे आ.रोहित पवार केंव्हाच भाऊ बनले आहेत.