Breaking News

विश्व वारकरी सेनेच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन

विश्व वारकरी सेनेच्या वतीने कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन
करंजी प्रतिनिधी-
 विश्व वारकरी सेनेच्या वतीने ह भ प योगेश महाराज करंजीकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शासनास कोपरगाव चे निवासी नायब तहसीलदार श्री योगेश कोतवाल यांच्या मार्फत विविध मागण्या सह आज निवेदन देण्यात आले.
    या निवेदनात श्री संत नामदेव महाराज यांच्या वंशजावरील व ह भ प  इंदोरीकर महाराज यांच्या वरील दाखल गुन्हे मागे घ्यावे तसेच फु बाई फु या टीव्ही कार्यक्रमातील संत व कीर्तनकार यांची नक्कल नक्कल करून जो संत कीर्तन परंपरेचा अपमान केला आहे त्या बद्दल त्या कार्यक्रमाचे आयोजक श्री निलेश साबळे व कलाकारांनवर तत्काळ गुन्हे दाखल करावे व येत्या गोकुळाष्टमी पासून गावातील मंदिरांमध्ये ५० भविकांनसह शासकीय नियमात भजनास परवानगी मिळावी असे निवेदन महाराष्ट्र शासनास निवासी नायब तहसीलदार यांच्या मार्फत देण्यात आले असून आमच्या मागण्याचा सरकारी पातळीवर योग्य तो विचार करून सरकारने लवकरात लवकर या वर निर्णय घ्यावा असे या वेळी ह भ प योगेश महाराज करंजीकर यांनी सांगितले.
 या निवेदनावर ह भ प योगेश महाराज, ह भ प बाळासाहेब दीक्षित, जनार्धन गायकवाड, भाऊसाहेब नाईक,नंदू तांबट,रविंद्र माळी, सुनील गाडे,अर्जुन साळुंखे,भाऊसाहेब साळुंखे, शंकर गोर्डे,गोकुळ विंचू,रत्नाकर जंगम,दत्तात्रय जोर्वेकर, संतोष जाधव,शैलेश शिंदे,गणपत लव्हटे, बर्गे सर,भाऊसाहेब जाधव,नवनाथ खेडेकर आदी संप्रदाय पंतांतील व विश्व वारकरी सेनेतील पंढदिकऱ्यांचा सह्या आहेत.