Breaking News

कोपरगाव मध्ये आण्णा भाऊ साठे ना अभिवादन !

कोपरगाव मध्ये आण्णा भाऊ साठे ना अभिवादन !
 करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव शहरात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती साजरी
कोपरगाव शहरातील टिळकनगर भागात लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांची जयंती भिम गर्जना तरुण मंडळाच्या वतिने साजरी करण्यात आली आहे.लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्ष असुन या वर्षी मोठ्या उत्साहाने भिम गर्जना तरुण मंडळाच्या वतिने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी होत आहे.कोपरगाव शहारात भिम गर्जना तरुण मंडळ बुध्दिष्ट यंग फोर्सच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली आहे.या वेळी प्रतिमेचे पूजन बुध्दीष्ट यंग फोर्सचे उपाध्यक्ष नितिन शिंदे यांचे हस्ते करण्यात आले.या जयंतीच्या कार्यक्रमात यावेळी नानासाहेब जगताप लक्ष्मण रोकडे विशाल कोपरे सचिन शिंदे जितेन्द्र साळवे रवि जाधव देविदास तुपसुंदर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.