Breaking News

कोपरगाव तालुक्यात ४० रुग्णाची भर तर ३५ कोरोना मुक्त !

कोपरगाव तालुक्यात ४० रुग्णाची भर तर ३५ कोरोना मुक्त !


करंजी प्रतिनिधी-
      कोपरगाव तालुक्यात दि २८ ऑगस्ट रोजी कोपरगाव कोविड सेंटर मध्ये एकूण १६२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या त्या पैकी ३४ अहवाल पॉजिटीव्ह तर १२८ अहवाल निगेटीव्ह आले तसेच काल नगर येथे तपासणी साठी ११ पाठविले होते त्यापैकी ३ पॉजिटीव्ह तर ८ निगेटिव्ह त्याचबरोबर एका खाजगी लॅब च्या रिपोर्ट नुसार ३ अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामिण रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. 
गांधीनगर  - २
साईसिटी -१
खडकी  -१
धरणगाव रोड -२
गजानन नगर - १
टिळक नगर - १२
महादेव नगर - १
सराफ बाजार  -१
कालेमळा - ७
सप्तर्षी मळा- १
गिरमे चाळ -१
अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ -१
गजानन नगर - १
खडकी -१
पंचायत समिती समोर - १
लौकी  -२
सोनेवाडी - १
मूर्शतपूर - १
संजीवनी -१
संजीवनी - १
    यात कोपरगाव शहरात ३४ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण आढळून आले आहे. 
    असे एकूण ४० रुग्णाची भर तालुक्यात पडली आहे. तर आज ३५ कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे.
आज पर्यंत तालुक्यातील एकूण कोरोना रुग्णाची संख्या  ८०२ झाली आहे तर सध्या ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या १८१ आहे.
तालुक्यातील एकूण १५ रुग्णांनी कोरोनाने आपले प्राण गमावले आहे.