Breaking News

संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल !

संगमनेरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा सुमारे पाच लाखांच्या मुद्देमालासह २३ आरोपींवर गुन्हे दाखल ! 


संगमनेर/प्रतिनिधी :
     संगमनेर शहरातील जय जवान चौक परिसरात एका नवीन इमारतीच्या बांधकामात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत तब्बल ४ लाख ८३हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ज्यात ३९ हजार ४६० रुपये रोख तर ४ लाख ४४ हजार २०० रुपयांचे ६ मोटारसायकल आणि १३ मोबाईलचा समावेश आहे. याशिवाय २१ आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून २ आरोपी घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्याकडून समजलेली अधिक माहिती अशी कि, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. पवार यांना गुप्त खबऱ्याकडून मिळालेल्या माहीनुसार संगमनेर शहरातील जय जवान चौक परिसरात पत्त्यांचा हारजीतचा खेळ सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आज दि.२६ रोजी (मध्यरात्री दीड ते तीन वाजेच्या दरम्यान) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याठिकाणी छापा टाकून वरील कारवाई केली. 
निखिल अधिक शाह (वय-२९, मालदाडरोड), राजेंद्र संताजी कानवडे (वय-२५, निमगावपागा), सुनील केशव धात्रक (वय-३९, मालदाडरोड), गणेश बारकू धामणे (वय-३२,रा. इंदिरानगर,), प्रतीक संजय कांबळे (वय-१९,रा. इंदिरानगर), विजय एकनाथ आरगडे  (वय-३३, मालदाडरोड), दशरथ शिवराम भुजबळ (वय-४८,रा. इंदिरानगर,), ओमकार सुनील गोडसे (वय-१९, रा.भरीतकरमळा), शुभम दत्तात्रय काळे (वय-२५, मालदाडरोड), प्रतीक जुगलकिशोर जाजू  (वय-२५, गणेशनगर), नवनाथ रेवनाथ हडवळे (वय-२४, गुंजाळ आखाडा), शिवम विजय कोकणे  (वय-२८, मालदाडरोड), संदीप विजय शिंदे  (वय-२५, गणेशनगर ), अनिल बबन गायकवाड़ (वय-२९, वैदवाडी, शिवाजीनगर), निलेश अशोक काळे (वय-३०, रा.कोळेवाडी रोड), गौरव कैलास जेधे (वय-२७, रा.जेधे कॉलोनी), अमजद दाऊद सय्यद (वय-४०, सय्यदबाबा चौक), राहुल लक्ष्मण हांडे (वय-२२,रा. शिवाजीनगर), शुभम गोरख रहाणे (वय-२३,रा.गुंजाळवाडी), सुरेश आंबादास पगारे (वय-५४,रा.घुलेवाडी) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आरोपी रवि देवराम म्हस्के (वय-४०, रा. मालदाडरोड), गोविंद दासरी (रा.विडी कामगार सोसायटी) हे घटना स्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. 
स्थानिक गुन्हे शाखेचे पोना. सचिन दत्तात्रय आडबल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात मु.जु.का.क. १२(अ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोनि. अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोनी. परदेशी करीत आहे.