Breaking News

६५ वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी, ठाकरे सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने बदलला !

 ठाकरे सरकारचा आदेश मुंबई ...

 मुंबई/प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ६५ वर्षांवरील कलाकारांना आणि क्रू मेंबर्सना स्टुडिओ किंवा आऊटडोअर सेटवर काम करण्यास महाराष्ट्र राज्य सरकारने मनाई केली होती. या निर्णयाविरोधात कलाकारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने मालिका-चित्रपटाच्या सेटवर काम करण्याची परवानगी दिली आहे.

सरकारने जारी केलेले दोन ठराव मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी रद्द केले. चित्रपट व टीव्ही कलाकार प्रमोद पांडे (७०) आणि इंडियन मोशन पिक्च्ार्स प्रोड्यूसर असोसिएशनच्यावतीने वकील अशोक सरोगी यांच्यामार्फत दाखल केलेल्या दोन याचिकांवर खंडपीठाने निर्णय दिला. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीसाठी लागू असलेल्या इतर सर्व नियमावली चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम करणार्‍या पासष्टीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांनाही लागू असतील, असेही  न्यायमूर्ती एस. जे. काठावाला आणि आर. आय. चगला यांच्या खंडपीठाने सांगितले.
------------------------------