Breaking News

गुरुकुल शैक्षणिक व सामाजिक कार्यावर भर देणार – प्रमोद जगताप

गुरुकुल शैक्षणिक व सामाजिक कार्यावर भर देणार
– प्रमोद जगताप


कोपरगाव प्रतिनिधी  – 
      शिक्षक बँक हि शिक्षकांची कामधेनू असून भविष्यात शिक्षक सभासदांच्या हित जोपासण्यासाठी गुरुकुल शिक्षक मंडळ कटिबद्ध असून शैक्षणिक व समाजिक कार्यावर भर देणार असल्याचा मनोदय कोपरगाव शिक्षक समितीचे मावळते अध्यक्ष, गुरुकुल शिक्षक समितीचे जिल्हा प्रतिनिधी व डॉ.संजय कळमकर गटाचे खंदे समर्थक प्रमोद जगताप यांनी म्हटले आहे. गुरुकुल शिक्षक मंडळाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी मंडळाचे सर्वेसर्वा व राज्याचे संपर्क प्रमुख डॉ.संजय कळमकर,राज्य उपाध्यक्ष रायाजी औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, सुदर्शन शिंदे, उचधिकार अध्यक्ष नितीन काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुकुल शिक्षक मंडळ व समितीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी शुक्रवार (दि.२८) रोजी पार पडल्या. याप्रसंगी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना प्रमोद जगताप यांनी आपले मत व्यक्त केले.
यावेळी प्रमोद जगताप म्हणाले की, सर्व शिक्षक बांधव, भगिनींना भविष्यात शैक्षणिक कामात येणाऱ्या अडीअडचणी गुरुकुलच्या माध्यमातून सोडविणार तसेच विद्यार्थी गुणवत्ता वाढी साठी येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध राहणार असून जिल्ह्यात कोपरगाव तालुका गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल आहे व तो यापुढेही राहिलं यासाठी सामुहिक प्रयत्न केले जातील. तसेच शिक्षणाच्या पवित्र ज्ञानदानाबरोबरच सामाजिक कार्यावर गुरुकुल मंडळ भर देणार आहे. आमचे मार्गदर्शक डॉ.संजय कळमकर, रायाजी औटी, संजय धामणे, सुदर्शन शिंदे, नितीन काकडे यांच्या माध्यमातून जिल्ह्यात राबवलेल्या शिक्षक हिताचा व सामाजिक कामाचा वारसा आम्ही पुढे चालविणार आहे. कोपरगाव तालुक्यात गुरुकुल च्या माध्यमातून सर्व आदर्श कार्यभार करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. निवड करण्यात आलेले सर्व शिक्षक बंधू भगिनीनींची केलेल्या निवडी अतिशय योग्य असून नवनिर्वाचित पदाधिकारी आपल्या कामातून टाकलेली जबाबदारी यशस्वीपने पार पडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त करून सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यावेळी निवड करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे :- शिक्षक समिती-अध्यक्ष दत्तात्रय गरुड, सरचिटणीस लक्ष्मीकांत वाडीले, कार्याध्यक्ष नंदकुमार दिघे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सैंदाणे, तालुका गुरुकुल मंडळ अध्यक्ष-संजय खरात, सरचिटणीस वाल्मिक निळकंठ, कार्याध्यक्ष गणेश पाचोरे, कोषाध्यक्ष कैलास वाघ, कोपरगाव तालुका गुरुकुल डिसीपीएस संघटना अध्यक्ष - श्रीकांत साळवे, सरचिटणीस श्रीमती भाग्यश्री गिरी, कार्याध्यक्ष – राहुल वायखिंडे, कोषाध्यक्ष अंकुश चव्हाण, गुरुकुल तंत्र स्नेही मंडळ-अध्यक्ष महेंद्र गोसावी, सरचिटणीस अनुजकुमार ढुमणे, कार्याध्यक्ष अशोक शिरसाठ, कोषाध्यक्ष संतोष थोरात. गुरुकुल मंडळ महिला आघाडी –अध्यक्ष श्रीमती.सुनिता मोरे, सरचिटणीस श्रीमती सविता जमधडे कार्याध्यक्ष श्रीमती अलका जाधव, कोषाध्यक्ष श्रीमती सुलोचना कुळधरण, कार्यालयीन चिटणीस श्रीमती ज्योती मेहेरखांब, उपाध्यक्ष श्रीमती सुनिता गायकवाड, श्रीमती मंगला गोपाळे, श्रीमती संध्या वाकचौरे, संघटक श्रीमती दीप्ती रजपूत, संपर्क प्रमुख श्रीमती वैशाली डोंगरे, सहसरचिटणीस संतोषी चव्हाण, मार्गदर्शक श्रीमती आरती सिन्नरकर, श्रीमती आशा इंधे, श्रीमती अनिता अंभोरे. उच्चधिकार समिती गुरुकुल मंडळ अध्यक्ष दादासाहेब महानुभव,सरचिटणीस आप्पासाहेब चौधरी, कार्याध्यक्ष सीताराम गव्हाणे, कोषाध्यक्ष तुळशीराम वसईकर आदी पदाधिकाऱ्यांच्या अधिकृतपणे श्रेष्ठींच्या उपस्थितीत निवडी करण्यात आल्या असल्याची  माहिती प्रमोद जगताप यांनी दिली आहे.