Breaking News

कोपरगाव शहरातील दत्तनगर भागातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा !

कोपरगाव शहरातील दत्तनगर भागातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
करंजी प्रतिनिधी-
         कोपरगाव शहरातील दत्त नगर परिसरातील वाढत्या मोकाट जनावरांचा कोपरगाव नगरपालिकेने वेळीच बंदोबस्त करावा असे निवेदन नगराध्यक्ष विजय वाहडणे यांना नागरिकांच्या वतीने  अक्षीता राजेश आमले यांनी दिले.
       या निवेदनावर मच्छिन्द्र अहिरे, राजू भोईर, नंदा राक्षे, मोहम्मद अली पठाण, संध्या जगताप, जनार्दन पगारे, अनिल परदेशी, चेतन टोरपे, प्रल्हाद परदेशी, हेमलता चव्हाण,रामदास शेळके आदींच्या सह्या आहेत.
      या निवेदनाद्वारे कोपरगाव नगरपालिकेला विनंती केली आहे की शहरातिल दत्तनगर भागात दिवसेंदिवस  गाई, कुत्रे, डुक्कर या अशा मोकाट जनावरांचा वावर वाढतांना दिसून येत आहे त्या मुळे सगळीकडे अस्वछता पसरली असून दुर्गंधी तयार झाल्याने डासांचे प्रमाण वाढून डेंगू मलेरिया सारखे आजाराचे प्रमाण वाढण्यास वाव मिळू शकतो मुळात आधीच नागरिक कोरोना मुळे अडचणीत सापडले असून त्यात या साथीच्या आजाराची  भर पडू नये म्हणून वेळीच नगरपालिकेने योग्य ती पावले उचलावी.
       या मोकाट जनावराने शहरात वेळी अवेळी वाहनचालकांना आडवे येतात त्यामुळे या भागात खूप वेळा वाहनचालक पडले असून त्यांना दुखापती झाल्या आहे तर कित्येक वेळा दूध विक्रेत्यांना यांचा त्रासाला सामोरे जावे लागल्याने त्यांचे दुधाचे नुकसान देखील झाले आहे. या जनावरांन मुळे लहान मुलांना अंगणात खेळणे देखील अवघड होऊन बसले आहे त्या मुळे मा नगराध्यक्ष साहेबांनी योग्य त्या उपाययोजना करून या त्रासापासून दत्तनगर परिसरातील नागरिकांची मुक्तता करावी अशी विनंती केली आहे.