Breaking News

जिल्हा परिषद शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या रद्द फक्त, विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या !

जिल्हा परिषद शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या रद्द फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
     अहमदनगरजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या पुर्णपणे रद्द केले असून फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यासाठी शासनाने आज पत्र काढले असल्याचे पत्रक राजेंद्र शिंदे यांनी माहिती साठी प्रसिध्दीस दिली. 
        महाराष्ट्र शासन या पुर्वी दि 15/7/20 च्या पत्रा नुसार राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षकाचे फेब्रुवारी 2014 च्या जीआर नुसार प्रशासकीय व विनंतीनुसार बदल्या करण्यात यावी असे कळविले होते. त्या प्रमाणे जिल्हा परिषद कर्मचार्याचे बदल्या ही झाल्या मात्र शिक्षकाचे संख्या मोठी असल्याने अनेक अडचणी मुळे बदल्या थांबल्या होत्या. 
         महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने( शिवाजीराव पाटील गट)राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या रद्द करून फक्त विनंतीनुसार बदल्या करण्यात यावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने राज्य शासन कोवीड 19 प्रदुर्भाव विचारात घेऊन शिक्षकाचे संख्या मोठी असल्याने बदल्याच्या वेळी समुपदेशन करताना सोशल डिस्टनशींग पाळणे अवघड आहे म्हणून शिक्षकाचे प्रशासकीय बदल्या पुर्णपणे रद्द केले आहे फक्त विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या दि 15/7/20 च्या पत्रा नुसार  विहीत मुदतीत करण्याची सुचना दिली आहेत.अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने आ.निलेशजी लंके यांच्या माध्यमातून  मान .ना. हसन मुश्रीप, ग्रामविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य.तथा  पालकमंत्री अहमदनगर  यांची भेट घेऊन प्राथमिक शिक्षकांच्या  प्रशासकीय  बदल्या न  करता फक्त विनंती बदल्या समुपदेशनाने कराव्यात असे निवेदन दिले होते. 
      त्यावेळी शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही व तसे आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन  दिले होते  त्याप्रमाणेआदेश सर्व  जिल्हा परिषदांना दि.५/८/२०२० रोजी प्राप्त झाले आहेत.या निर्णयाबद्दल मा.ना.मुश्रीप साहेब व आ.निलेशजी लंके साहेब यांचे  जिल्हा संघ अध्यक्ष राजेंद्र शिंदे. सदिच्छा मंडळ  अध्यक्ष रविंद्र पिंपळे,मोहनराव शिंदे ,अनिल आंधळे,  राजू कुदनर ,ज्ञानेश्वर माळवे, उद्धव  मरकड, सुभाष खेडकर,बाबा आव्हाड,चंद्रकांत मोढवे, बाळासाहेब खिलारी,नवनाथ तोडमल, गोकुळ कळमकर, माधव हासे, शैलेष खणकर, सय्यद अली इ.आभार व्यक्त केले आहेत.