Breaking News

पारनेर तालुक्यात आज १५ अहवाल पॉझिटिव्ह २७ अहवाल निगेटिव्ह !

पारनेर तालुक्यात आज १५ अहवाल पॉझिटिव्ह २७ अहवाल निगेटिव्ह !
-----------
निघोज येथील एका व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू, जवळा येथे वाढत आहे कोरोना चा संसर्ग !
-----------
आज दिवसभरामध्ये रॅपिड चाचणी झाली नाही !


पारनेर प्रतिनिधी - 
   पारनेर तालुक्यातील आज दिवसभरामध्ये प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी च्या अहवालानुसार १५ व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.
यामध्ये जवळा ६, निघोज ३, पारनेर ३, रायतळे १, पळसपुर १, भाळवणी १, या गावातील व्यक्तींचा पॉझिटिव्ह अहवालात समावेश आहे.
    तर तालुक्यातील २७ अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत यामध्ये पारनेर शहरातील २५ अहवालाचा समावेश आहे कळस व भांडगाव प्रत्यकी एक हे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत.
तालुक्यातील निघोज येथील ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे हा व्यक्ती पुणे येथे कोरोना चे उपचार घेत होता परंतु उपचारादरम्यान  मृत्यू झाला ६ दिवसांपूर्वी या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला होता गेल्या काही दिवसांपासून पारनेर तालुक्यात रोज एक कोरोना मुळे मृत्यू होत आहे ही चिंतेची बाब होत चालली आहे ्यामुळे पारनेर शहर व तालुक्‍यातील काही गावे ठराविक दिवसांसाठी बंद ठेवले आहेत.
     तालुक्यातील जवळा येथे देखील कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे गेल्या काही दिवसांपासून येथे पॉझिटिव रुग्णांची संख्या वाढली आहे.
    वाढत्या रुग्णां मुळे  संपर्कात आलेल्या लोकांची संख्या वाढत आहे आज व काल या दोन दिवसांचे शासकीय लॅब ला  जवळपास शंभर चाचणी अहवाल प्रलंबित आहेत.
     तसेच आज दिवसभरामध्ये रॅपिड किट संपले असल्याने चाचणी झाली नाही त्यामुळे आज कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे मात्र रॅपिड किट उपलब्ध झाल्यानंतर  संख्या वाढण्याची शक्यता आहे.