Breaking News

मोटार सायकल डंपर अपघातात एक ठार,डाऊच खुर्द शिवारातील घटना !

मोटार सायकल डंपर अपघातात एक ठार,डाऊच खुर्द शिवारातील घटना !


  कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
  कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते पुणतांबा रस्त्यावर डाऊच खुर्द शिवारात  हॉटेल माईल स्टोन च्या समोर गुरुवार रोजी  रात्री आठ वाजेच्या दरम्यान  रस्त्यावर नादुरुस्त असल्याने हयगईने उभ्या असलेल्या डंपर   (क्रं.एम.एच.१४ सी.पी.६५३४ ) वर   मागच्या बाजूने वेगाने कोपरगावच्या दिशेने जाणारी दुचाकी (क्रमांक-एम.एच.१७ बी.एच.८६६५) आदळून झालेल्या अपघातात गाभनवाडी चंदनापूर ता.संगमनेर येथील दुचाकी स्वार भाऊसाहेब सखाराम केदार (वय-५४) हे जागीच ठार झाले आहे.या बाबत संतोष दशरथ पवार (वय-४०) रा.समतानगर शिक्षक कॉलनी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
  सदरचे सविस्तर वृत्त असे की,मयत भाऊसाहेब केदार हे महावितरण कंपनीत फोरमन या पदावर कार्यरत होते ते रात्री आठच्या सुमारास आपल्या गावावरून आपल्या कर्तव्यावर जात असताना डाऊच खुर्द शिवारात हॉटेल माईल स्टोन च्या समोर  एक डंपर नादुरुस्त झाला असल्याने रस्त्यावर बाजूला न घेता रस्त्यावरच उभा होता मयतास पुढील उभा असलेल्या डंपर या वाहनांचा अंदाज न आल्याने ते जोराने मागील बाजूने कोपरगावकडे जाताना धडकले . त्या अपघातात ते इतके जोराने धडकले की त्यांच्यासह ती दुचाकीच त्या डम्परमध्ये रुतून बसली होती.त्या अपघाताचा मोठा आवाज झाल्याने नजीकच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांना बाहेर काढून त्यांना कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलवले मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्याना तपासणी नंतर त्यांना मृत घोषित केले कोपरगाव पोलिस स्टेशनला गुन्हा रजी.नंबर व कलम ५५१ / २०२० भा द वी ३०४ (अ ) २८३ मो.वे.अॕ. १२२/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.