Breaking News

कार कंपनीचा कर्मचारी आहे 'हा' श्वान


नवी दिल्ली - करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरात लॉकडाऊन करण्यात आले होते. यामुळे अनेक नागरिकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. परंतु, ह्युंदाई कंपनीत चक्क एका श्वानाला नोकरी देण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर त्याला कंपनीचे आयडी कार्डही देण्यात आले आहे.

ब्राझीलच्या एस्प्रिटो सॅंटो राज्यात ह्युंदाईचे एक शोरूम आहे. अनेकदा हा कुत्रा या शोरूमच्या बाहेर फिरत होता. कालांतराने येथील कर्मचाऱ्यांशी त्याची मैत्री झाली. टुशों प्राइम असे त्या कुत्र्याला नाव देण्यात आले. यानंतर मे मध्ये शोरूमच्या कर्मचाऱ्यांनी त्याला कर्मचारी म्हणून नियुक्त केले. कुत्रा येथे सेल्समन म्हणून तैनात असून स्वतःचेआयडी कार्डदेखील आहे.

प्राइम डीलरशिपमध्ये हा एक सेल्स डॉग आहे. हा नवीन सदस्य जवळपास एक वर्षाचा असून तो ह्युंदाई कुटुंबात सामील झाला होता आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांची आणि ग्राहकांची मने जिंकली आहेत, अशी पोस्ट ह्युंदाई कंपनीने इंस्टाग्रामवर केली आहे.

या सेल्स डॉग सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. यामुळे आता या कुत्र्याच्या नावाने एक स्वतंत्र इन्स्टाग्राम अकाउंटही तयार केले असून २८ हजाराहून अधिक फॉलोअर्स आहेत.