Breaking News

श्रीगोंदा तालुका राजकीय भूकंपाच्या दिशेने भाजपला धक्का बसण्याची शक्यता !

श्रीगोंदा तालुका राजकीय भूकंपाच्या दिशेने भाजपला धक्का बसण्याची शक्यता !
------------
कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार,अजून प्रवेशाबाबत कोणताही निर्णय नाही -म्हस्के 
-------------


श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी : 
    श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणात लवकरच खळबळ होणार असून भाजप चे जेष्ठ नेते राजेंद्र म्हस्के हे हातात शिवबंधन हातात बांधून धनुष्यबाण हाती घेऊन शिवसेना प्रवेश करणार असल्याची माहितीस  समजली आहे 
श्रीगोंदा तालुक्यात भाजप चे जेष्ठ नेते म्हणून ओळख असणारे माजी पंचायत समिती सदश्य राजेंद्र म्हस्के हे काही दिवसात भाजप ला सोडचिठी देऊन हातात शिवबंधन बांधणार असल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे म्हस्के यांनी श्रीगोंदा तालुक्यात भाजप जिवंत ठेवण्याचे काम केले अतिशय खडतर परिस्थितीत भाजप चा अजेंटा गावोगावी पोहचविला पण जिल्हा परिषद निवडणुकीत म्हस्के यांच्या कन्येला डावलण्यात आले त्यांच्या ऐवजी  पंचशीला गिरमकर यांची उमेदवारी पक्षाने लादली त्यामुळे नाईलाजाने किरण राजेंद्र म्हस्के यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती त्यात किरण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता तेंव्हा पासून राजेंद्र म्हस्के हे भाजप वर नाराज असल्याचे दिसून येत होते तरीसुद्धा लोकसभा निवडणुकीत भाजप च्या उमेदवाराचा प्रचार म्हस्के यांनी केला पण तरीही काही दिवस राजकारणापासून अज्ञातवासात असणारे म्हस्के हे काही दिवसापासून तालुक्यात पुन्हा सक्रिय झाले आहे पण त्यांना मानणारा मोठा गट तालुक्यात आहे त्यामुळे त्या गटाचा विचार घेऊन प्रवेशाचे निर्णय घेणार असल्याचे समजते 
पण आज दिवसभर श्रीगोंदा तालुक्यात राजेंद्र म्हस्के व  वैभव पाचपुते हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती पण ती फक्त चर्चाच होती अजून कार्यकर्त्यांशी बोलायचे व त्यानंतर निर्णय घ्यायचा आहे असे म्हस्के म्हणाले 

***
प्रवेशाबाबत अजून निर्णय नाही 
शिवसेना पक्षात प्रवेश करण्याबाबत कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे १५ ऑगस्ट पूर्वी प्राथमिक चर्चा झाली आहे माझ्या काही अटी त्यांना सांगितल्या आहेत तालुक्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा शब्द मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांशी पुन्हा चर्चा केल्यावरच शिवसेना प्रवेशाबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याची प्रतिक्रिया भाजप चे जेष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी सांगीतले.
*****
पाचपुते समर्थक वैभव पाचपुते हि सेनेच्या मार्गावर ?
बाजार समितीचे माजी उपसभापती व विद्यमान संचालक वैभव [पाचपुते यांनीही भाजप ला व पर्यायी आमदार पाचपुते यांच्या पासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आहे म्हस्के हे सेनेत जाणार असल्याचे पाचपुते यांना समजल्यावर काल दि २२रोजी श्रीगोंदा येथील विश्रामगृहावर वैभव पाचपुते व राजेंद्र म्हस्के यांची बैठक झाली असल्याची प्राथमिक माहिती समजली जर म्हस्के प्रवेश करत असतील तर मला काही अडचण नाही असे वैभव पाचपुते यांनी सांगीतले त्यामुळे पाचपुते हि सेने च्या मार्गावर असल्याचे  समजते