Breaking News

एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून नवनाथ सुर्यवंशी यांची दुसऱ्यांदा निवड !

एज्युकेटर एक्स्पर्ट म्हणून नवनाथ सुर्यवंशी यांची दुसऱ्यांदा निवड !

  
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
   अहमदनगर मायक्रोसॉफ्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटीव एज्युकेटर एक्स्पर्ट’ या पुरस्कारासाठी कोपरगाव तालुक्यातील श्री.नवनाथ सूर्यवंशी यांची यांची निवड करण्यात आली आहे.वर्गातील अध्यापनात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण पद्धतीत वेगळेपणा निर्माण करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार मायक्रोसॉफ्ट च्या वतीने दिला जातो. 
नवनाथ सूर्यवंशी या शिक्षकाने,  विद्यार्थ्यांना व्हर्चुअल फिल्ड ट्रीपच्या माध्यमातून तसेच मायक्रोसॉफ्टच्या विविध तंत्रज्ञानाच्या साधनांचा अध्यापनात वापर करून अध्यापनात मनोरंजकता आणल्याने त्यांचा मायक्रोसॉफ्ट एजुकेटर एक्स्पर्ट म्हणून निवड करण्यात आली.
तसेच Skype  च्या माध्यमातून हॅरीसन ब्रँच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना २० देशातील १५० पेक्षा अधिक शाळा आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे,तसेच त्यांनी जगभरातील निवडक शिक्षकांना skype द्वारे  व्हिडीओ निर्मितीचे प्रशिक्षण दिले होते.शाळेत वेगवेगळ्या देशातील  शिक्षक व विद्यार्थ्यांशी mystery skype द्वारे संवाद साधला जातो. सदर  उपक्रमासाठी त्यांची MIE Expert म्हणून निवड करण्यात आली.
नवनाथ सूर्यवंशी यांना मिळालेल्या या बहुमानाने सर्व पालक व समाजातून त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे.तसेच मायक्रोसॉफ्टच्या education.microsoft.com या वेबसाईटवर मायक्रोसॉफ्टने शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाच्या वापराविषयी वेगवेगळे ऑनलाईन कोर्सेस मोफत उपलब्ध करून दिले आहेत.त्यातूनच इतर देशातील विद्यार्थी व शिक्षकांशी तुम्ही ऑनलाईन संवाद साधू शकता.तेथील हवामान,प्राणी,आहारविहार,संस्कृतीची देवाणघेवाण करू शकतात.यातूनच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे. व विद्यार्थ्याची जिज्ञासूवृत्ती वाढत जाऊन त्यांची शैक्षणिक प्रगती झपाट्याने होत आहे.तरी सर्व शिक्षकांनी मायक्रोसॉफ्टच्या या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाची कवाडे सातासमुद्रापार उघडे करा.असे आवाहन नवनाथ सूर्यवंशी यांनी केले.