Breaking News

कोविडग्रस्तांसाठी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे हस्ते ५० हजार रुपयांचे औषधे देवून साजरा केला मुलाचा वाढदिवस!

नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे संचालक ह्रदयरोग तज्ञ डॉ. काळे यांनी कोविडग्रस्तांसाठी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे हस्ते ५० हजार रुपयांचे औषधे देवून साजरा केला मुलाचा प्रथम वाढदिवस!


नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलचे संचालक ह्रदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे व परिवाराचे वतीने डॉक्टर काळे यांनी आपल्या मुलाच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी कोरोना या संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ५० हजार रुपयांचे औषधे नेवासा कोविड सेंटरला श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांचे हस्ते तालूका वैद्यकिय अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांच्या कडे सुपूर्त करुन आपल्या चिरंजिवाचा प्रथम वाढदिवस एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याने काळे परिवाराचे सर्वस्थरांतून कौतूक केले जात आहे.
श्वास हॉस्पिटलचे संचालक प्रसिद्ध ह्रदयरोग तज्ञ डॉ अविनाश काळे यांच्या एक वर्षाचा चिरंजिव 'निष' याच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून आपणही समाजाचे देणे लागतो या उदात्त हेतूने कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखवा म्हणून डॉ. काळे यांनी श्रीक्षेञ देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या उपस्थितीत कोविडग्रस्तांसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी यांच्याकडे ही औषधे देवून "दवा आणि दुवा" गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते कोरोनाग्रस्तांना बहाल केल्यामुळे डॉक्टरही संकटात खरे "देवच" असल्याचे त्यांनी आपल्या चि.निष याच्या प्रथम वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाग्रस्तांना दिलेल्या औषधाची मदतीतून दाखवून दिल्यामुळे डॉ काळे व परिवाराचे सर्वस्थरांतून अभिनंदन केले जात आहे या कार्यक्रमाप्रसंगी डॉ अविनाश काळे,सौ.प्रियंका काळे,चि.निष काळे,गणेश लंघे उपस्थित होते.