Breaking News

संजीवनी पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी विकसीत केले नवीन अॕप !

संजीवनी  पाॅलीटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी  विकसीत केले नवीन  अॕप !
( आत्मनिर्भर भारत संकल्पनेतुन वाटचाल )


कोपरगाव/ तालुका प्रतिनिधी :
      अलिकडे भारत चीन संबंध बिघडल्याने भारताने चिनी बनावटीच्या ५९ अॕप्सवर बंदी आणली. त्यात शेअर इट आणि झेंडर अॕप्सचा समावेश  होता. त्यामुळे फोटो, फाईल, व्हीडिओ, गाणे शेअर करण्यासाठी कोणते अॕप वापरायचे असा प्रश्न  होता. मात्र संजीवनी पाॅलीटेक्निकच्या सर्वेश  सुभाष  होन आणि जयेश  संजय देशमुख या विद्यार्थ्यांनी  आपल्या बुध्दी चातुर्याच्या जोरावर शेअरकर हे नवीन अॕप विकसीत केले. त्यांचे हे पावुल म्हणजे आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकटी दिल्या सारखेच आहे, अशी   माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग श्री अमित कोल्हे यांनी या विद्यार्थ्यांचे  अभिनंदन करून संजीवनी मध्ये मिळालेल्या ज्ञानाचा वापर करीत नाविण्याचा शोध  घेतल्याबध्दल कौतुक केले. सर्वेश  व जयेशच्या यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  कार्याध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे यांनी त्यांचे व त्यांचे आई वडील सुभाष  हरीभाऊ होन, सारीका सुभाष  होन, संजय संभाजीराव देशमुख व सरला संजय देशमुख यांचा कोविड  १९ चे मार्गदर्शक  तत्वे पाळून सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर व विभाग प्रमुख प्रा. जी. एन. जोर्वेकर, प्रा. एम. व्ही. खासणे उपस्थित होते.
         सत्कार प्रसंगी सर्वेश  व जयेश  यांनी सांगीतले की अॅप कसे विकसीत करावे याचे प्रशिक्षण  आम्हाला संजीवनीतुन मिळाले. सरकारने चिनी बनावटीच्या अॅपवर बंदी घातल्यावर संधी म्हणुन आम्ही नवीन अॕप विकसीत करण्याच्या मागे लागलो आणि यशस्वीही झालो. त्यांनी सांगीतले की हे अॅप पुर्णतः भारतीय असुन वापरण्यास अत्यंत सोपे व सुरक्षित आहे. एक जीबी पर्यंत असलेल्या एक्सल, पिक्चर, व्हीडिओ व कोणतीही फाईल फक्त एका मिनिटात शेअर होतात. झेंडर व शेअरइट पेक्षाही जलद गतीने फाईल शेअर होते.
     संजीवनच्या पत्रकात पुढे म्हटले आहे की कोरोना विषाणुचा प्रादर्भाव रोखण्यासाठी देशात लाॅकडाऊन करण्यात आला होता. या लाॅकडाऊन काळात अनेकांनी सदउपयोग करीत आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या जोरावर व आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांच्या आधारे नाविण्याचा शोध घेतला. यात संजीनीच्या सर्वेश  व जयेश  यांनी  शेअरकर’ हे अॕप विकसीत करून संजीवनीच्या शिरेपेचात मानाचा तुरा खोवला. हे अॕप प्लेस्टोअरवर उपलब्ध असुन शेकडो मोबाईल धारकांनी ते इन्स्टाॅल केले.