Breaking News

नाटेगावातील त्या बेवारस शौचालयाचे मालक कोण ?

नाटेगावातील त्या बेवारस शौचालयाचे मालक कोण !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
भारताचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत मिशन चा नारा देऊन घर तिथे शौचालय योजना राबवण्याचा निर्णय घेतला असून या योजनेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना बारा हजार रुपये अनुदान जाहीर केले मात्र या योजनेतून ग्रामस्थांनी लाभ घेत असताना सरकारी तिजोरीची स्वच्छता होत असल्याचे दिसून येत आहे
नाटेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक व ग्राम पंचायतीचे पदाधिकारी या योजनेतून सरकारी तिजोरीची चांगलीच स्वच्छता केली असल्याचे दिसून येते या बाबत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार केलेली असताना आता नवीनच धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला 
ग्रामपंचायत हद्दीत जिथे कोणतेही घर नाही वस्ती नाही गेल्या अनेक वर्षांपासून कोणीच राहत नाही अशा ठिकाणी शौचालय बांधकाम केलेले असून अर्धवट शौचालयाचे बांधकाम झालेले या बेवारस शौचालयाचा फॉर्म कोणी भरला ?
सदर  शौचालय अनुदान कोणी घेतले?
 सदर शौचालयाचा पूर्णत्वाचा दाखला कसा दिला गेला ? हे बेवारस शौचालय बांधकाम होत असताना नेमकी हा पैसा गेला कोणाला   याची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थानी  एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

नाटेगाव येथिल शौचालयांसंबंधी ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारींची सध्या सुट्या असल्यामुळे मंगळवार ४ आॕगस्ट पासुन संबंधित विभागा मार्फत सखोल चौकशी करणार असल्याचे कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना आमच्या प्रतिनिधीला सांगितले !