Breaking News

जिद्द, चिकाटी, मेहनत केल्यास यश निश्चित मिळते : संजय गुरसळ

जिद्द चिकाटी मेहनत केल्यास यश निश्चित मिळते.. संजय गुरसळ
 (डाऊच खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
शैक्षणिक जीवनात दहावी आणि बारावी ही दोन महत्त्वाची केंद्रे मानली असून पुढील करिअर करण्यासाठी येथे मोठे यश संपादन करावे लागते. जिद्द चिकाटी आणि मेहनत केल्यास यश निश्चितच मिळते असे प्रतिपादन डाऊच खुर्दचे सरपंच संजय गुरसळ यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील डाऊच खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.डाऊच खुर्द ग्रामपंचायतीच्या वतीने  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डाऊच खुर्द परिसरातील विद्यार्थी परंतु वेगवेगळ्या स्कूलमध्ये शिक्षण घेत घेऊन त्यांनी गावाचे नाव रोशन केले त्याबद्दल त्यांचा सत्कार झाला.यावेळी दिगंबर पवार, चंद्रकांत गुरसळ, सलीम शेख ,शंकर गुरसळ ,गंगाधर गुरसळ ,बाळासाहेब गुरसळ, गंगाधर पीठे ,शामराव गुरसळ,देवा पवार, ग्रामसेवक बी एम गायकवाड,  पाडेकर भाऊसाहेब अदी उपस्थित होते. 
ओम गुरुदेव इंटरनॅशनल स्कूलमध्ये प्रथमेश अप्पासाहेब गुरसळ याने 94 टक्के गुण मिळवून यश संपादन केले. न्यू इंग्लिश स्कूल चांदेकसारे येथे ऋषिकेश दिलीप सोनवणे याने 90 टक्के गुण मिळवत प्रथम येण्याचा मान मिळवला तर त्याच विद्यालयात तृतीय क्रमांक 88 टक्के गुण मिळवून प्रथमेश संदीप गुरसळ यानेही सुयश संपादन केले.व महर्षी विद्या मंदिर सीबीएससी पॅटर्न अंतर्गत बारावी मध्ये 80 टक्के गुण मिळवत तेजश्री शामराव गुरसळ हिने यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व सुदंर पेन देत सन्मान करण्यात आला.तर ग्रामसेवक बीएम गायकवाड यांची बदली झाल्यामुळे त्यांना निरोप देत त्यांचा सत्कार करण्यात आला.नवीन ग्रामसेवक पाडेकर भाऊसाहेब यांनी पुढील जबाबदारी स्वीकारली त्यांचाही सरपंच संजय गुरसळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन दिगंबर पवार यांनी केले तर आभार पाडेकर भाऊसाहेब यांनी मानले