Breaking News

अखेर त्या काळवीटची मृत्यूशी झुंज अपयशी !

अखेर त्या काळवीटची मृत्यूशी झुंज अपयशी !
घोटण/प्रतिनिधी :
        शेवगाव-पैठण रोडवरील घोटण लगत रस्त्यावर काळवीट व चारचाकी कारची जोरदार धडकेने काळविटाचा जागीच मृत्यू झाला आहे. सविस्तर असे की, आज सकाळी नऊ वाजता शेवगाव कडून पैठण कडे जाणाऱ्या अज्ञात चार चाकी कारला काळवीट रोड क्रॉस करत असताना जोराची धडक बसली. त्यामुळे काळवीट जागीच खाली कोसळून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने तडफडत असलेल्या काळविटाचा जागीच अंत होऊन काळवीटाची मृत्यूशी झुंज ही अपयशी ठरली. 
        यातच घटनेच्या ठिकाणी मागून येणाऱ्या मोटरसायकलचा देखील या गोंधळात अपघात झाला आहे. मोटरसायकल चालक जखमी झाल्याने उपचारासाठी शेवगाव येथे नेण्यात आले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला देताच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी येऊन सदर घटनेचा पंचनामा करून काळवीट विभागाने ताब्यात घेतले आहे.