Breaking News

राहुरीत कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर नियम पाळून बैल पोळा उत्साहात साजरा !

राहुरीत कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर नियम पाळून बैल पोळा उत्साहात साजरा !
राहुरी शहर प्रतिनिधी :
      राहुरीत आज श्रावणाच्या शेवटच्या दिवशी कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर नियम पाळून पोळा उत्साहात साजरा करण्यात आला . यंदाच्या वर्षी पावसाची चांगलीच आबादानी राहिल्याने बळीराजाचा उत्साह बैलांच्या जोडीच्या संगती ने ओसंडून वाहून दिसून येत होता . यावर्षी कोरोना हे संकट असले तरी गेले अडीच महिने चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचा उत्साह वाढलेला दिसून येत होता . आज राहुरीतील शनि चौकातील मारुती मंदिर येथे दुपारी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना दर्शनासाठी आणले होते . यावेळी बैलांना सजविण्यात आले होते  यावेळी नागरिकांसह लहान मुलांनी पाहण्या ही मजा घेतली.