Breaking News

कोपरगावात तिसऱ्या दिवशी ९५० कुटूंबाची तपासणीत आणखी ७ कोरोना रुग्णाची भर !

कोपरगावात तिसऱ्या दिवशी ९५० कुटूंबाची तपासणीत आणखी ७ कोरोना रुग्णाची भर


करंजी प्रतिनिधी :-
     कोपरगाव तालुक्यातील वाढती कोरोनाची संख्या लक्षात घेता ही वाढती साखळी तोडण्यासाठी कोपरगाव शहर चार दिवस बंद ठेऊन
कोपरगाव आरोग्य विभागातर्फे शहरातील उपनगरात ज्या भागात जास्त संख्या वाढतेय अशा सर्व विभागाची घरोघर जाऊन आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन करत आज तिसऱ्या दिवशी गांधीनगर गोरोबनगर व महादेवनगर या भागातील सुमारे ९५० कुटुंबातील ७२६२ च्या आसपास नागरिकांची घरोघरी जावून तपासणी करण्यात आली आहे.
      त्यात ४५ व्यक्तीना कोरोनाची लक्षणे दिसली त्या त्यांची रँपिड अँटीजन किट द्वारे तपासणी करण्यात आली त्यात ७ नागरिक कोरोना पाॅझिटिव्ह आढळुन आले आहे. या आरोग्य विभागाच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचा निर्णयामुळे दररोज कोरोना पॉजिटीव्ह रुग्णाची संख्या वाढतांना दिसेल परंतु या मुळे वाढती कोरोना साखळी लवकर तोडण्यास मदत नक्कीच होऊ शकते. 
    या सर्व तापसणी साठी तहसीलदार योगेश चंद्रे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत सरोदे बारकाईने लक्ष ठेऊन असून यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव अंगणवाडी सेविका आशा केंद्र सेविका नगरपालिका अधिकारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहे.