Breaking News

राज्यमंत्री बच्चु कडूंचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर.!

 आमची अवस्था ग्रामपंचायत ...

अमरावती : कोरोना रोगाचा फटका, दूध दरवाढ मिळत नसल्याने आर्थिक तोटा, बोगस बियाणं, वादळ, मान्सून, कीड, खतांसाठी करावा लागणार खटाटोप अशा सर्वच प्रतिकूल परिस्थितीतुन शेतकऱ्यांना जावं लागत आहे. यावरूनच आता राज्यमंत्री बच्चु कडू यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

विदर्भात सर्वाधिक सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र, बोगस बियाणांमुळे पीक उगवलंच नाही, आणि जे उगवलं ते वाढलच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोग आला आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करुन त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश बच्चू कडू यांनी दिले.

यानंतर बच्चु कडू यांनी, ‘ ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करुन पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे,’ असे सांगितले. तर, पुढं त्यांनी शेतकऱ्यांच्या सद्याच्या परिस्थितीवरून सरकारलाच खडेबोल सुनावले. "राज्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भात सरकार गंभीर नाही. आधी बियाणे बोगस निघालं. आता पिकावर रोग येतात आहे. त्यामुळे राज्यातील कृषी खातं झोपलं आहे की काय?" असा घणाघातच त्यांनी केला आहे.