Breaking News

क्रांतिसूर्य म.फुले मागासवर्गीय वाचनालयातर्फे शाहिर अण्णाभाऊ साठेजयंती साजरी.

क्रांतिसूर्य म.फुले मागासवर्गीय वाचनालयातर्फे शाहिर अण्णाभाऊ साठे
जयंती साजरी.
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
 कोपरगाव   तालुक्यातील संवत्सर येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले मागासवर्गीय वाचनालय मंडळाच्या वतीने शाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या
शताब्धी महोत्सव निमित्ताने जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.  सदर प्रसंगी  पंडित भारूड यांनी शताब्धी निमित्ताने सरकारने लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मान करावा., त्यांचे राज्यातील अपूर्ण स्मारक पुर्ण करावेत, साठे
महामंडळ निधी  पुर्णपणे समाजासाठी वापरावा, तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण करून सर्व शैक्षणिक संस्था, वाचनालय
यांना मोफत वाटप करावे अशी मागणी संस्थचे अध्यक्ष पंडित भारूड, यांनी मांडली. यावेळी फिजिकल डिस्टन्स ठेवून रंगा अण्णा  निरगुडे , विजय काकडे,दिलीप मैंद , अविनाश भारूड, सम्यक भारूड,किशोर मैंद,  नंदू आचारी, पोपट
भाकरे, राजेंद्र पांडव, पंकज चंदनशिव,  वैभव कांबळे, निलेश कांबळे,  गणेश कांबळे, दिपक कांबळे, साई थोरात, प्रमोद रगडे आदि मान्यवर उपस्थित
होते.शेवटी प्रास्ताविक व आभार किशोर मैंद यांनी मानले