Breaking News

कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषी 'कन्येचे' महीला बचत गटास मार्गदर्शन !

"कृषी महाविद्यालय लोणी" येथील कृषी 'कन्येचे' महीला बचत गटास मार्गदर्शन


काष्टी :- श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे मागील दोन महिन्यापासून "कृषी महाविद्यालय लोणी प्रवरा" येथील कृषिकन्या कुमारी प्रतीक्षा मधुकर कांबळे ही ग्रामीण कृषी कार्यानुभव हा उपक्रम राबवत आहे. या उपक्रमाअंतर्गत आज गावामध्ये महिला बचत गट मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत गावामध्ये वेगवेगळी शेतीची प्रात्यक्षिके राबविण्यात येत आहेत. याकामी गावचे सरपंच श्री.आबासाहेब शितोळे यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी महाविद्यालय लोणी येथील प्राचार्य प्रा.निलेश दळे, प्रा.रमेश जाधव, प्रा.अमोल खडके व डॉ.दिपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. गावामधून या उपक्रमास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.