Breaking News

माजी मंत्री अनिल राठोड यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली !

Ajit Pawar contradicts party chief Sharad Pawar on EVM controversy
मुंबई । वृत्तसंस्था – 
        शिवसेनेचे उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे आज पहाटे निधन झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनिल राठोड यांना श्रद्धांजली वाहिली. माजी राज्यमंत्री, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांचे निधन झाल्याचे समजून धक्का बसला. त्यांच्या निधनाने सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं कर्तृत्ववान नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. 
      लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी प्रदीर्घ काळ केलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आम्ही सर्वजण त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, ही प्रार्थना. या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली.