Breaking News

नेवासा तालूक्यात एका दिवसात १९ नव्या रुग्णांची वाढ, कोरोनाचा कहर वाढल्याने प्रशासनाच्या डोक्याला 'ताप' !

नेवासा तालूक्यात एका दिवसात १९ नव्या रुग्णांची वाढ, कोरोनाचा कहर वाढल्याने प्रशासनाच्या डोक्याला 'ताप' !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
     नेवासा तालूक्यात कोरोनाचा कहर वाढत चालल्याने प्रशासनाच्या डोक्याला ताप वाढला आसून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आरोग्य विभाग कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी एकीकडे जंग-जंग पच्छाडत आसतांना दुसरीकडे माञ तालूक्यात सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत चालल्याने कोरोना या संसर्गजन्य आजाराचे 'भूत' काही केल्या उतरत नसल्याचे तालूका आरोग्य विभागाला मिळालेल्या अहवालातून समोर येत आहे.
      बुधवार (दि.५) रोजी तालूका आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालात बुधवारी १९ नव्या रुग्णांची वाढ झालेली अाहे. त्यामध्ये चांदा ५, नेवासा ११,नारायणवाडी १,धनगरवाडी १ व नेवासा बुद्रूक येथील एकाचा समावेश झाल्याची माहीती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
       तालूक्यात २८३ एकूण रुग्णांपैकी १८० रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे ९७ रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत तर ६ रुग्णांचा मृत्यु झाल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या माहीतीतून समोर येत आहे.कोरोना या संसर्ग रुग्णचा कहर तालूक्यात वाढलेला दिसून येत आहे. आरोग्य विभाग कोरोनाचा नायनाट करण्यासाठी प्रयत्नशिल आसतांना दुसरीकडे तालूक्यात सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर प्रशासनाकडून अंकूश रहात नसल्याने सोशल डिस्टन्सचा फज्जा उडत चालल्याने कोरोनाच्या संकट मोठे गडद होत चालले आहे याकडे प्रशासनाने लक्ष घालून सार्वजनिक गर्दी आटोक्यात येणे गरजेचे असल्याचे मतही जाणकारांतून व्यक्त केले जात आहे. कोरोना मुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर कोविड  सेंटरमधून एक रुग्ण सिरियस   अाहे. अशी माहिती मिळत आहे.