Breaking News

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

Parth Pawar: Profile, Wiki, Age and Girlfriend

 मुंबई : बॉलिवूड दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा मोठा निर्णय सर्वाच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी विनंती पत्राद्वारे केली होती. 'सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्ये प्रकरणी योग्य चौकशी व्हावी अशी भावना संपूर्ण देश आणि विशेषत: तरुणांची आहे. त्यामुळे याप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू करण्यात यावी.' असं ट्विटही पार्थ पवार यांनी केलं होतं. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही मागणी फेटाळून लावली होती.

दरम्यान, याच मुद्यावर शरद पवारांनी जाहीरपणे पार्थ पवारांना फटकारलं होतं. त्यानंतर आज सर्वाच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पार्थ पवार यांनी सत्यमेव जयते असं ट्विट करत प्रतिक्रिया दिली असून पार्थ पवार यांनी केलेल्या ट्विटला हजारो रिट्विट आणि लाईक्स आहेत.