Breaking News

नाटेगाव येथे दहा वर्षे वयाच्या मुलाचा शेततळ्यात बुडुन मृत्यू !

नाटेगाव येथे दहा वर्षे वयाच्या मुलाचा शेततळ्यात बुडुन मृत्यू !


कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
  कोपरगाव तालुक्यातील   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाटेगाव या  शाळेतील विद्यार्थी संतोष श्रावण घोरपडे   वय १० वर्षे - इयत्ता चौथी या विद्यार्थ्याचा  शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे
     याबाबत हकीगत अशी की नाटेगाव येथिल रहिवासी श्रावण नारायण घोरपडे यांची नाटेगाव- बदापुर रोड लगत शेतजमीन व वस्ती असुन वस्ती पासुन जवळच शेतात पत्नी,व मुलगी  एक १० वर्षे वयाचा मुलगा मुगाच्या शेंगा तोडीत असताना मुलगा संतोष ला शेंगा तोडायचा कंटाळा आला म्हणून तो शेजारी असलेल्या शेततळ्या च्या कडेला लिंबाच्या झाडाखाली एकटाच खेळु लागला खेळताखेळता लिंबावर चठने उतरणे करीत असताना त्यातील एक फांदी शेततळ्यावर टेकलेली होती नेमके तो त्याच फांदी वरुन तळ्यावर उतरला त्याचा पाय भरव्यावर न पडता शेततळ्याच्या कागदावर पडल्याने तो घसरुन तळ्यात पडला त्याच्या आईला वाटले की संतोष घरीच गेला सायंकाळी आई व मुली घरी आल्यावर संतोषची चौकशी केली असता तो घरी आलाच नसल्याचे कळले परत शेताकडे शोधाशोध केली असता तो ज्या ठीकाणी खेळत होता तेथील शेततळ्यावर काहींनी पाहीले असता कागदावरुन पाय सरकल्याच्या खुना स्पष्ट दिसत होत्या व संतोष शेततळ्यातच गेल्याचे स्पष्ट झाले पोहणा-यांनी संतोषचा मृतदेह वर काठला असता त्याचा मृत्यू झाला होता या घटनेने नाटेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असुन संतोष हा आई बापाला एकटाच असुन त्यास एक १३ व दुसरी ९ वर्षाची बहीण आहे  घटना घडल्या नंतर  मयत विद्यार्थी  संतोष श्रावण घोरपडे यांच्या घरी भेट देऊन गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे,केंद्र प्रमुख राजेंद्र ढेपले,दिलीप ढेपले यांनी घोरपडे कुटुंबाचे सात्वन करत धीर दिला. 


 दरम्यान मागील महिन्यात सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पढेगाव येथील सातवी वर्गातील विद्यार्थी  सुद्धा पाण्याच्या खदानीत बुडून मयत झाला.
 या दोन्ही प्रकरणांत जवळच्या नातेवाईक, शेजारी व अन्य गावकऱ्यांनी पोस्ट मार्टन करण्या बद्दल अवगत केलं असतं तर राजीव गांधी  सहानुग्रह अपघात योजनेचा लाभ देता आला असता तर कोपरगाव तालुक्यातच जून पासून आज पर्यंत पाच घटनांमध्ये पाच मुला मुलींना आपला जीव गमवावा लागला.
 यातील २ मृत्यू विजेच्या धक्क्याने, २ मृत्यू पाण्यात बुडून , १ विष बाधाने  मृत्यू  झाल्याच्या घटना असुन अशा घटना घडू नयेत म्हणून वाट्स अॕप  ग्रुप वर पालकांना आपल्या पाल्याचे बुडून मृत्यू, रस्ते अपघातात मृत्यू, विद्युत शॉक ,सर्प दंश - अन्नातून विषबाधा,आग  अशा  क्रमाने  धोक्या  पासून संरक्षण करण्यासाठी  उद्बोधन करावे व आपण बालरक्षक म्हणून  कार्य करावे असे आवाहन  सुज्ञ नागरिकांनी   केले आहे